आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक,पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द

रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.
File Photo
File Photo
Published on

मुंबई : रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीतील काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा, दिवा येथे थांबतील. सकाळी ९.५० वाजताची वसई रोड-दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.४५ वाजताची दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. दुपारी १२.५५ वाजता वसई रोड- दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. दुपारी २.४५ वाजता दिवा- वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. रत्नागिरी-दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी-कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील.

पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल रद्द करण्यात येतील. हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

logo
marathi.freepressjournal.in