तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मेगा ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावण्याची शक्यता असून काही लोकल रद्द करण्यात आल्याचे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती आदी विविध कामांसाठी रविवार २८ जानेवारी रोजी मध्य हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावण्याची शक्यता असून काही लोकल रद्द करण्यात आल्याचे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या कालावधीत पनवेल स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि सीएसएमटी स्थानकातून पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल स्थानकातून ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

सीएसएमटी वाशी विशेष लोकल

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

तर ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईनवर लोकल उपलब्ध असणार आहे. बेलापूर - नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट - मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते ३.३५ पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत चर्चगेट - मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in