मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

१० नोव्हेंबरला मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, १० नोव्हेंबरला मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे चार तासांचा ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे - कल्याण स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० दरम्यान दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून कल्याण स्थानकात जाणाऱ्या लोकल ठाणे - कल्याण स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कळवा, मुंब्रा व दिवा या स्थानकात लोकल थांबतील. तर कल्याण स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल कल्याण - ठाणे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. दिवा, मुंब्रा व कळवा स्थानकात लोकल थांबतील. तर मुलुंड स्थानकातून पुढे जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर सीएसएमटी, दादर स्थानकातून सुटणाऱ्या मेल एक्स्प्रेस ठाणे कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या लेनवर वळवण्यात येतील. तर कल्याण स्थानकातून सीएसएमटी दादरला येणाऱ्या मेल एक्स्प्रेस कल्याण, ठाणे व विक्रोळी दरम्यान सहाव्या लेनवर वळवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

हार्बर मार्गावर कुर्ला - वाशी स्थानकादरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी बेलापूर पनवेलला जाणाऱ्या व पनवेल स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेवर चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक!

पश्चिम रेल्वे मार्गावर सिंगल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी शनिवारी रात्री १२ ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल - माहिम स्थानकादरम्यान चार तासांत ब्लॉक घेण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in