
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावरील विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ५व्या आणि ६व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्या पर्यायी मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.
ब्लॉक कालावधीत अप मार्गावरील मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. तर सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी अप लाईन सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.
ब्लॉक काळात उपलब्ध सेवा
सीएसएमटी मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल.
ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध.
बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध.