तांत्रिकी कामांसाठी आज ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे यादरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार
 तांत्रिकी कामांसाठी आज ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

विविध तांत्रिक कामांसाठी रविवार, ३१ जुलै रोजी हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली-गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे यादरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील. तर सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मात्र मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in