मध्य, ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, ४ फेब्रुवारी रोजी मध्य, ट्रान्स हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
मध्य, ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई : रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, ४ फेब्रुवारी रोजी मध्य, ट्रान्स हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत तिन्ही मार्गांवरील काही लोकल उशिराने धावत असून काही लोकल रद्द करण्यात आल्याचे मुंबई उपनगरीय रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाऊन मार्गावर वळवण्यात आल्या आहेत, तर घाटकोपर स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या असून कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

ट्रान्स हार्बर डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ठाणे-वाशी-नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालावधीत ठाणे स्थानकातून वाशी-नेरूळ-पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी-नेरूळ-पनवेल स्थानकातून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली-अंधेरी स्थानकादरम्यान अप जलद व गोरेगाव-बोरिवली स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत बोरिवली-अंधेरी स्थानकादरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in