तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

विलेपार्ले व राम मंदिर स्थानकांवर लोकल थांबणार नाही
तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार १३ ऑगस्ट रोजी मध्य हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. दुरुस्तीच्या कामामुळे तिन्ही मार्गावरील काही लोकल उशीराने धावण्याची शक्यता असून लोकल रद्द करण्यात येतील, मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत माटुंगा - मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, तर ठाणे स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल मुलुंड - ठाणे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावरील मानखुर्द - नेरुळ स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी पनवेल, बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या व पनवेल बेलापूर व वाशी स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मेगा ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर व मेन लाईन मार्गावरुन प्रवासाची परवानगी दिली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ - गोरेगाव स्थानकादरम्यान अप डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे सांताक्रुझ - गोरेगाव स्थानकादरम्यान लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. विलेपार्ले व राम मंदिर स्थानकांवर लोकल थांबणार नाही.

कधी व कुठे

मध्य रेल्वे

मुलुंड - माटुंगा - सकाळी - ११.० ते ३.५५

हार्बर मार्ग

मानखुर्द - नेरुळ - सकळी - ११.१५ ते ४.१५

पश्चिम रेल्वे

सांताक्रुझ - गोरेगाव - स‌काळी १० ते दु.३

logo
marathi.freepressjournal.in