४८०० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन-एमडी ड्रग्ज नष्ट; वरळी अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

जप्त केलेल्या ड्रग्जची विल्हेवाट लावण्यासाठी रितसर परवानी घेण्यात आली होती
४८०० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन-एमडी ड्रग्ज नष्ट; वरळी अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
Published on

गेल्या वर्षी मुंबईसह नालासोपारा, अंबरनाथ, अंकेश्‍वर आणि गुजरात येथील केमिकल कंपनीतून जप्त करण्यात आलेला ४८०० कोटी रुपयांचा मेफेड्रॉन आणि एमडी ड्रग्जचा साठा वरळी युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नष्ट केला आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपीची मुंबईसह इतर ठिकाणी असलेली दहा कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता या पथकाने जप्त केली आहे.

गेल्या वर्षी एमडी तस्करीच्या एका गुन्ह्यांची नोंद करून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्यांच्या इतर सहकार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत मुख्य आरोपीसह आठ आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी २४२९ किलो ४२० वजनाचा ४८५६ कोटी ४१ लाख रुपयांचा मेफेड्रॉन आणि एमडीचा साठा जप्त केला होता. याच ड्रग्जच्या पैशातून मुख्य आरोपीने मुंबईसह इतर ठिकाणी कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता नंतर भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील सक्षम अधिकार्‍यांच्या आदेशावरुन जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या ड्रग्जची विल्हेवाट लावण्यासाठी रितसर परवानी घेण्यात आली होती. या परवानगीनंतर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीमधील बंदिस्त भट्टीत हा ड्रग्जचा साठा जाळून नाश करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in