फुकट्या प्रवाशांसाठी 'मेरा तिकीट मेरा इमान', तिकीटासह प्रवासी व्हिडिओ शेअर करा स्पर्धा ; तीन विजेत्यांना रोख पारितोषिक

मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात २५ लाखांहून अधिक प्रवासी पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करतात.
फुकट्या प्रवाशांसाठी 'मेरा तिकीट मेरा इमान', तिकीटासह प्रवासी व्हिडिओ शेअर करा स्पर्धा ; तीन विजेत्यांना रोख पारितोषिक
PM

मुंबई : फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी आणि अधिकृत तिकिटांसह प्रवास करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'मेरा तिकीट मेरा इमान' स्पर्धेचे पश्चिम रेल्वेने आयोजन केले आहे. या स्पर्धेतर्गत सर्व स्तरातील स्पर्धक प्रवाशांनी प्रवास करत असताना तिकिटासह छोटे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकायचे आहेत. तसेच सर्वाधिक लाइक्सच्या आधारावर पश्चिम रेल्वेकडून तीन विजेत्यांना रोख रकमेचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात २५ लाखांहून अधिक प्रवासी पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करतात. विना तिकीट प्रवास कायद्याने गुन्हा आहे, असा इशारा वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतो. तरीही विना तिकीट प्रवास करण्यात काही प्रवासी धन्यता मानतात. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु आता विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शिस्तीचे धडे देण्यासाठी तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळणार आहे. तिकीट काढून अधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीटासह व्हिडिओ शेअर करावा. यासाठी गूगल फाॅर्म क्यू आर कोड सगळ्या स्थानकातील तिकीट खिडकी आणि पश्चिम रेल्वेच्या सोशल मीडिया हॅडल ' WeRMumbai' वर फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब और X पर @drmbct उपलब्ध आहेत.

पश्चिमरेल्वेकडूनआयोजितस्पर्धेतीलविजेत्यांचीनावे२६जानेवारी२०२४मध्येजाहीरकरण्यातयेणारआहे. यातप्रथमपुरस्कार१२,५००, द्वितीयपुरस्कार७,५००आणितृतीयपुरस्कार५०००रुपयेदेऊनगौरविण्यातयेणारआहे

logo
marathi.freepressjournal.in