वडाळ्यात मेटल पार्किंग कोसळली

मुंबईत अचानक आलेल्या वादळी पावमामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.
वडाळ्यात मेटल पार्किंग कोसळली
Published on

मुंबईत अचानक आलेल्या वादळी पावमामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. वडाळा पूर्व बरकतअली नाका, वेअर हाऊसच्या समोर, श्रीजी टॉवरमध्ये मेटल पार्किंग बसवण्याचे काम सुरू असताना सोमवारी सायंकाळी ४.२२ वाजता ते रोडच्या बाजूला कोसळले. या दुर्घटनेत ८ ते १० जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सुखरुप बाहेर काढले. मात्र एक जण जखमी झाला असून, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेटल पार्किंग कोसळल्याने परिसरात जोरदार आवाज झाल्याने एकच घबराट पसरली. या दुर्घटनेत मेटल पार्किंगखाली ८ ते १० गाड्या अडकल्या. अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढले, मात्र यात एक जण जखमी झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दुर्घटनेमुळे बसमार्गात बदल

बरकत अली दर्गा याठिकाणी साईट पार्किंग लिफ्ट रस्त्यावर पडल्याने डाऊन मार्गावरून जाणारे बसमार्ग बंद करण्यात आले. यामध्ये प्रतीक्षा नगर ते म्युझियम बस क्रमांक १४, प्रतीक्षा नगर ते मंत्रालय बस क्रमांक १५, प्रतीक्षानगर ते मंत्रालय बस क्र. ८८, संगम नगर ते वडाळा स्था. बस क्र ११७, प्रतीक्षा नगर ते वरळी दूरदर्शन मार्ग क्र १७२ व भरणी नाका ते वडाळा स्थानक बस क्र १७४ हे बसमार्ग देवेंद्र चौक वरून अँटॉप हिलहून बसमार्ग क्रमांक ९ च्या मार्गाने गुरू तेग बहादूर स्थानकमार्गे वडाळा चर्च, महेश्वरी उद्यान मार्गाने परावर्तीत करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in