कापूरबावडी ते दुर्गाडी मेट्रो मार्गास मंजुरी; कुंभमेळ्यासाठी १ हजार ६३ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता

मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा १ आणि टप्पा २ अर्थात ठाण्यातील कापूरबावडी ते धामणकर नाका आणि धामणकर नाका ते दुर्गाडी अशा एकूण १८ हजार १३० कोटी रुपयांच्या कामांना बुधवारी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १ हजार ६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली.
कापूरबावडी ते दुर्गाडी मेट्रो मार्गास मंजुरी; कुंभमेळ्यासाठी १ हजार ६३ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता
कापूरबावडी ते दुर्गाडी मेट्रो मार्गास मंजुरी; कुंभमेळ्यासाठी १ हजार ६३ कोटीच्या प्रस्तावाला मान्यताप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा १ आणि टप्पा २ अर्थात ठाण्यातील कापूरबावडी ते धामणकर नाका आणि धामणकर नाका ते दुर्गाडी अशा एकूण १८ हजार १३० कोटी रुपयांच्या कामांना बुधवारी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १ हजार ६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक पार पडली.

या बैठकीत मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा १ आणि टप्पा २ च्या कामांना तसेच नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या भूसंपादनासाठी लागणारे कर्ज हुडकोकडून घेण्यास मंजुरी देण्यात आली. मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा १ आणि टप्पा २ अशा एकूण १८ हजार १३० कोटी ५५ लाख रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. या मार्गिकेची लांबी ३४.२१ किमी असून ज्यामध्ये १९ स्थानकांचा समावेश आहे.

नागपूर-गोंदिया महामार्गाची लांबी १६२.५७७ कि.मी.

नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग या महामार्गाची एकूण लांबी १६२.५७७ कि.मी. असून, प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत १९,५८२.१९ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ३,१६२.१८ कोटी रुपयांच्या खर्चास, भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग ९४.२४१ कि.मी. लांबीच्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ९३१.१५ कोटी रूपये, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग हा प्रकल्प २०४.७९९ कि.मी. लांबीचा असून याच्या भूसंपादनासाठी २,३५३.९४ कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.

कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांची कामे गतीने करा...

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत. भाविकांसाठी वाहनतळ , पाणीपुरवठा, विद्युतविभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, मुख्य नियंत्रण कक्ष यासाठी १ हजार ६३ कोटी रूपयांच्या कामांचे प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली असून ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

६९ लाख लोकांना होणार फायदा

टप्पा १ कापूरबावडी ते धामणकर नाका आणि टप्पा २ धामणकर नाका ते दुर्गाडी असा आहे. मार्गिका ५अ दुर्गाडी - कल्याण – उल्हासनगर या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे ६९ लाख लोकांना फायदा होणार असून प्रवास वेळेत ४०-५०% बचत होईल. या प्रकल्पासाठीच्या आवश्यक परवानगीसाठी केंद्र सरकार आणि संबधित विभागाकडे गतीने कार्यवाही करावी, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.

प्रकल्प सहा वर्षात पूर्ण होण्यासाठी करा कार्यवाही...

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांचे 'प्रकल्प कार्यान्वित करण्याचे वेळापत्रक' निश्चित करण्याच्या सुचना तसेच निविदा प्रसिद्धी, निविदा अंतिम करणे आणि प्रकल्प पूर्णतेचा कालावधी निश्चित करावा. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज उभारण्याच्या प्रस्तावावर वित्त विभागाशी समन्वय साधून तातडीने मार्ग काढावा. सहा वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.

logo
marathi.freepressjournal.in