म्हाडाची लॉटरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात; किंमत कमी केल्याने विजेत्यांना ९३ कोटींचा दिलासा

म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीतील घरांच्या किंमती १० ते २५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे लॉटरीतील विजेत्यांना तब्बल ९३ कोटींचा दिलासा मिळणार आहे.
म्हाडाची लॉटरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात; किंमत कमी केल्याने विजेत्यांना ९३ कोटींचा दिलासा
Published on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीतील घरांच्या किंमती १० ते २५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे लॉटरीतील विजेत्यांना तब्बल ९३ कोटींचा दिलासा मिळणार आहे. तर प्राप्त होणाऱ्या घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्याचे नियोजन म्हाडाकडून सुरू आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेण्यात येणार असून ही लॉटरी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काढण्याचा विचार आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई मंडळाच्या घराच्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉटरीत अर्ज करू इच्छिणाऱ्या हजारो अर्जदारांचे अर्ज विविध कारणांमुळे रखडले आहेत. या अर्जदारांना अर्ज भरण्यास येत असलेली अडचण दूर करण्यासाठी म्हाडामार्फत अर्जदारांना व्हिडीओ पाठवून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच लॉटरी काढण्यासाठीची तयारी मंडळाने सुरू केली आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लॉटरीचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in