Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी ७५,३६६ अर्ज; आचारसंहिता संपल्यावर लॉटरीचे वेळापत्रक जाहीर होणार, प्रति घर सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त

म्हाडा मुंबई मंडळातर्फे २ हजार ६४० घरांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय लॉटरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लॉटरीसाठी ७५ हजार ३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार प्रति घर सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर विधान परिषद निवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहिता संपल्यानंतर लॉटरीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर करण्यात येणार आहे.
Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी ७५,३६६ अर्ज; आचारसंहिता संपल्यावर लॉटरीचे वेळापत्रक जाहीर होणार, प्रति घर सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त
Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी ७५,३६६ अर्ज; आचारसंहिता संपल्यावर लॉटरीचे वेळापत्रक जाहीर होणार, प्रति घर सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त
Published on

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळातर्फे २ हजार ६४० घरांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय लॉटरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लॉटरीसाठी ७५ हजार ३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार प्रति घर सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर विधान परिषद निवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहिता संपल्यानंतर लॉटरीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळाने ३० मार्च रोजी २ हजार ६४० घरांची संगणकीय लॉटरी जाहीर केली होती. लॉटरीस कमी प्रतिसाद मिळाल्याने मुंबई मंडळाने २८ मेपर्यंत मुदत दिली होती.

मुंबई मंडळांने घरांची कमी केलेली विक्री किंमत, काही योजनांना दिलेल्या सुविधा, पार्किंग सुविधा, बांधकाम, योजनांची महत्त्वाची ठिकाणे, बाजारमूल्यापेक्षा कमी किंमत इत्यादीचा अर्जदारांकडून विचार करता लॉटरीसाठी भरघोस प्रतिसाद प्राप्त झाला आहे.

लॉटरीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० जून रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १२ जून रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाइन दावे व हरकती दाखल करता येतील.

त्यानंतर प्राप्त दावे-हरकतींची छाननी करून १६ जून रोजी दुपारी ३ वाजता लॉटरीसाठी स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यानुसार आचारसंहितेची अंतिम तारीख २५ जून रोजी आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सोडतीचा दिनांक जाहीर करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in