Mumbai : म्हाडाची मास्टर लिस्ट; १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार

बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) संक्रमण शिबिरात वास्तव्याला असणाऱ्या मूळ भाडेकरू/रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांची पात्रता निश्चिती करून सदनिका वितरणासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने अर्ज मागवले आहेत. रहिवाशांना २७ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जदारांना १५ फेब्रुवारीला रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरता येणार आहे.
Mumbai : म्हाडाची मास्टर लिस्ट; १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार
Published on

मुंबई : बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) संक्रमण शिबिरात वास्तव्याला असणाऱ्या मूळ भाडेकरू/रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांची पात्रता निश्चिती करून सदनिका वितरणासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने अर्ज मागवले आहेत. रहिवाशांना २७ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जदारांना १५ फेब्रुवारीला रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरता येणार आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितील उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू/ रहिवासी यांना निष्कासन सूचना (व्हेकेशन नोटीस) देऊन इमारत खाली करण्यात आलेली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण इत्यादी कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत. परंतु, कमी सदनिका बांधण्यात आल्या आहेत, अशा वंचित मूळ भाडेकरू, रहिवासी यांना या आधी मंडळाद्वारे पुनर्रचित, पुनर्विकसित इमारतीमध्ये कायमस्वरूपी सदनिका देण्यात आलेली नाही व त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात स्वतः अधिवास धारण करत आहेत, अशासाठी ही ऑनलाइन अर्ज प्रकिया राबवण्यात येत आहे.

म्हाडाच्या www.mhada.gov.in या संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नरमध्ये जाऊन अप्लिकेशन फॉर मास्टरलिस्ट या पर्यायावर क्लिक करून अर्जदारांना नोंदणी करता येणार आहे तसेच नोंदणीची सुविधा masterlist.mhada.gov.in या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.

logo
marathi.freepressjournal.in