मिलन सब वे पूरमुक्त होणार,ताशी ६ हजार घन मीटर पाण्याचा उपसा होणार

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी मंगळवारी पाहणी केली
मिलन सब वे पूरमुक्त होणार,ताशी ६ हजार घन मीटर पाण्याचा उपसा होणार
Published on

सांताक्रूझ येथील मिलन सब वे परिसरात तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यातून वाहनचालक व पादचाऱ्यांना यंदाच्या पावसाळ्यात दिलासा मिळणार आहे. मिलन सब वे शेजारील मैदानावर दोन कोटी लिटर पाणी साठा करणारी भूमिगत टाकी बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तीन हजार घन मीटर पाण्याचा उपसा करणारे दोन पंप कार्यान्वित करण्यात आले असून ताशी ६ हजार घन मीटर पाण्याचा उपसा करण्याची क्षमता आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा उपसा करण्यासाठी उपयोग करावा, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी मंगळवारी पाहणी केली. जोरदार पावसात पाणी साचण्यापासून मिलन सबवेला दिलासा देण्यासाठी साठवण जलाशयाचे काम अत्यंत वेगाने सुरु असून यंदा त्याचा तात्पुरता वापर सुरु करता येणार आहे. सदर साठवण जलाशय हे सुमारे २ कोटी लीटर क्षमतेचे आहे. मिलन सबवे परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास त्याचा उपसा करुन या जलाशयात साठवले जाईल. त्यासाठी ३ हजार घन मीटर प्रतितास क्षमतेचे एकूण दोन उदंचन पंप कार्यान्वित केल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in