
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) सुरुवात झाली. यावेळी ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याकडून एक चूक घडली. आमदार नसतानाही ते राज्यपालांच्या अभिभाषणासाठी थेट सभागृहात दखल झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या चूक लक्षात आणून दिली. त्यांनतर ते तिथून बाहेर पडले. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यांना सुरक्षारक्षांनी आता कसे सोडले? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच, 'आमदार होण्याची इच्छा असेल म्हणून सर्वांसोबत संपर्क साधायचा असेल,' अशी टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला.
यावरून मिलिंद नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले की, "प्रेक्षक गॅलरी समजून चुकून मी सभागृहात जाऊन बसलो. चूक लक्षात आल्यानंतर लगेचच बाहेर पडलो." मात्र त्यांच्या या कृतीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, "मिलिंद नार्वेकरांची अनेक वर्षांपासून मदार होण्याची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदार बनवले नाही. मिलिंद नार्वेकर लवकर आमच्याकडे येऊ शकतात. ते आमच्या संपर्कात आहेत." असा दावा त्यांनी केला.