दूध पुन्हा महागणार; इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकांचा दावा

देशात २०२३पर्यंत दूध टंचाईची स्थिती असेल. मात्र, याचा फटका पंजाब आणि हरियाणाला बसणार नाही
दूध पुन्हा महागणार; इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकांचा दावा
Published on

आगामी काळात देशात दुधाच्या किमतीत वाढ होणार असल्याची शक्यता इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केली. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दुधाची मागणी वाढली आहे. मात्र, त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे सांगत त्यांनी दरवाढीचा अंदाज वर्तवला आहे.

देशात २०२३पर्यंत दूध टंचाईची स्थिती असेल. मात्र, याचा फटका पंजाब आणि हरियाणाला बसणार नाही, असे भाकितही नरके यांनी केले. दूध टंचाई फेब्रुवारी, मार्चपर्यंत राहणार आहे. त्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे.

इंडियन डेअरी असोसिएशनने राज्य सरकारला एक अहवाल सादर केला आहे. यावर माध्यमांशी बोलताना चेतन नरके म्हणाले की, दूध व्यवसायात दोन हंगाम असतात. त्यांना लीन सीझन आणि प्लश सीझन म्हणतो. फ्लश सीझनमध्ये आम्ही दुधाची पावडर करतो. ती विकतो. मात्र, यंदा फ्लश सीझन आलाच नसल्याची माहिती त्यांनी दिली.

फ्लश सीझनमध्ये दुधाच्या पुरवठ्यात चाडेचार टक्के वाढ होते. त्यामुळे या काळात दरवाढ होत नाही. मात्र, यंदा उलटे झाले. या काळात उत्पादन वाढले नाही. तर मागणी साडेसात ते आठ टक्क्यांनी वाढली. ही मागणी वाढत चालली आहे. त्याप्रमाणात दुधाचा पुरवठा नाही.

logo
marathi.freepressjournal.in