टॅक्सीचे किमान भाडे आता ३५ रुपये होणार? टॅक्सी यूनियनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मंगळवारपासून सीएनजीच्या किंमती प्रति किलो ६ रुपयांनी तर पाइप गॅस म्हणजेच पीएनजीच्या किंमती चार रुपयांनी कमी केल्या होत्या
टॅक्सीचे किमान भाडे आता ३५ रुपये होणार? टॅक्सी यूनियनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सीएनजीच्या किंमती कमी केल्याने काळी पिवळी टॅक्सी यूनियनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत; मात्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर टॅक्सीच्या किमान भाड्यात १० रुपयांनी वाढ करा, अशी मागणी टॅक्सी यूनियनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे टॅक्सीचे २५ रुपयेअसलेले किमान भाडे आता ३५ रुपये होणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारपासून सीएनजीच्या किंमती प्रति किलो ६ रुपयांनी तर पाइप गॅस म्हणजेच पीएनजीच्या किंमती चार रुपयांनी कमी केल्या होत्या. आता मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरांमध्ये सीएनजीचा दर ८० रुपये प्रतिकिलो तर पीएनजीची किंमत ४८.५० रुपये असणार आहे. इंधनाचे दर आटोक्यात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी काळी पिवळी टॅक्सी युनियनने पहिल्या १.५ किमी अंतरासाठी असलेले किमान भाडे २५ रुपयांवरून ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे. मूळ भाड्याच्या पलीकडे गेल्यास, सद्यस्थितीत ग्राहकांना प्रति किलोमीटर १७ रुपये द्यावे लागतात. त्यातही दररोजचा प्रवास व्यवहार्य होण्यासाठी त्यात आता ३ रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर रिक्षा भाडे २१ वरून २४ रुपये करण्याची मागणी रिक्षा ड्रायव्हर्सनी केली आहे.

सीएनजीच्या किंमतीमध्ये घट केल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; मात्र रोजचा प्रवास व्यवहार्य होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण केल्या जातील, अशी आशा आहे. - अल काड्रोस, टॅक्सी यूनियनचे महासचिव

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in