लोकलमध्ये अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग

सायंकाळी पाच वाजता परिक्षा संपल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली
लोकलमध्ये अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग

मुंबई : लोकल प्रवासादरम्यान एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चर्चगेट रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच प्रितेश मनसुखभाई टेलर या २१ वर्षांच्या आरोपी तरुणाला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा पुढील तपास कुर्ला रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सतरा वर्षांची ही तरुणी उल्हासनगर येथे राहत असून चर्चगेट येथील जयहिंद कॉलेजमध्ये अकरावीत शिकते. बुधवारी सकाळी ती तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजला जात होती. लोकलने प्रवास करताना दुपारी सव्वाबारा वाजता ही लोकल घाटकोपरला आली. यावेळी प्रितेश टेलर हा लोकलमध्ये चढला. या तरुणीच्या समोरील सीटवर बसून त्याने तिच्या पायाला अश्‍लील स्पर्श करुन तिच्याकडे पाहून अश्‍लील हावभाव केले होते.

सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ती दादर रेल्वे स्थानकात उतरली. तिच्या पाठोपाठ तोदेखील खाली उतरला आणि तिचा पाठलाग करू लागला. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन ती तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजला निघून गेली. सायंकाळी पाच वाजता परिक्षा संपल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली. यावेळी तोच तरुण तिच्या कॉलेजजवळ उभा होता. त्याने तिचा चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत पाठलाग केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने चर्चगेट रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in