जेजे रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; सफाई कर्मचाऱ्याला अटक

विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच रुग्णालयाचा सफाई कर्मचारी रोहिदास दयानंद सोलंकी याला जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली.
जेजे रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; सफाई कर्मचाऱ्याला अटक

मुंबई : अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार जेजे रुग्णालयात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच रुग्णालयाचा सफाई कर्मचारी रोहिदास दयानंद सोलंकी याला जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली.

मानखुर्दमध्ये राहणाऱ्या पीडितेने शनिवारी कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून वडिलांच्या मानसिक उपचाराच्या गोळ्या प्राशन केल्या होत्या. त्यामुळे तिला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिमहत्त्वाच्या विभागात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी १०.३० वाजता उपचारादरम्यान खराब झालले तिचे डायपर आणि बेड बदलत असतानाच तिच्या आईने सफाई कर्मचारी रोहिदास सोलंकी याची मदत घेतली होती. तिची आई तिचे डायपर बाथरूममध्ये टाकण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे कोणीही नसल्याची संधी साधून त्याने उपचार घेणाऱ्या मुलीचे चुंबन घेऊन तिच्या छातीवर हात फिरवून तिचा विनयभंग केला होता.

हा प्रकार नंतर तिच्या आईला समजताच तिने घडलेला प्रकार जे. जे. मार्ग पोलिसांना सांगून रोहिदास सोलंकीविरुद्ध तक्रार केली होती. तिने दिलेल्या तक्रार अर्जावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात घडलेल्या या घटनेने तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

logo
marathi.freepressjournal.in