..तर 'मीरा-भाईंदर बंद'ची हाक द्यावी लागेल! -आमदार प्रताप सरनाईक

संपूर्ण देश श्रीराममय झालेला असताना, मीरारोड येथे रविवारी रात्री श्रीराम भक्तांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.
..तर 'मीरा-भाईंदर बंद'ची हाक द्यावी लागेल! -आमदार प्रताप सरनाईक

संपूर्ण देश श्रीराममय झालेला असताना, मीरारोड येथे रविवारी रात्री श्रीराम भक्तांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. याप्रकरणी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना शिष्टमंडळासह सोमवारी सकाळी भेट घेतली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तत्काळ एसआयटी स्थापन करून या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व आरोपींवर पुढील ४८ तासांत कठोर कारवाई करावी. जेणेकरून शहरामध्ये शांतता व सामाजिक एकता कायम राहील अन्यथा नाइलाजास्तव शिवसेना पक्षाचा एक रामभक्त व मीरा-भाईंदर शहराचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून दि. २५ जानेवारी रोजी मला हजारो रामभक्तांबरोबर आंदोलनात सहभागी होऊन शिवसेना पक्षातर्फे शांततामय मार्गाने मीरा-भाईंदर शहर बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in