Mira Bhayandar : क्रिकेट प्रशिक्षकाकडून महिला क्रिकेटपटूचा विनयभंग

क्रिकेट शिकवण्याच्या बहाण्याने १९ वर्षीय महिला क्रिकेटपटूचा वारंवार विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मिरारोड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मिरारोड पोलिसांनी संबंधित क्रिकेट प्रशिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mira Bhayandar : क्रिकेट प्रशिक्षकाकडून महिला क्रिकेटपटूचा विनयभंग
Mira Bhayandar : क्रिकेट प्रशिक्षकाकडून महिला क्रिकेटपटूचा विनयभंगप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

भाईंदर : क्रिकेट शिकवण्याच्या बहाण्याने १९ वर्षीय महिला क्रिकेटपटूचा वारंवार विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मिरारोड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मिरारोड पोलिसांनी संबंधित क्रिकेट प्रशिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश मेंडन असे गुन्हा दाखल झालेल्या क्रिकेट प्रशिक्षकाचे नाव आहे. पीडित तरुणी ही क्रिकेटपटू असून, ती आणि प्रशिक्षक विघ्नेश मेंडन हे मैदानावर सरावासाठी अनेकदा एकाच रिक्षेतून प्रवास करत असत. तक्रारीनुसार, या प्रवासादरम्यान तसेच मैदान परिसरात आरोपीने पीडितेच्या संमतीशिवाय विनयभंग केला.

पीडितेने या कृत्याला विरोध केल्यानंतर आरोपीने मैदानावर इतरांसमोर पीडितेला अश्लील शिवीगाळ करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

या प्रकाराबाबत पीडित तरुणीने आरोपीच्या पत्नीला तसेच दुसऱ्या प्रशिक्षकाला माहिती दिली. त्याचा राग मनात धरून आरोपीने, ‘माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार केली तर मी आत्महत्या करीन आणि त्याला तूच जबाबदार असशील,’ अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून मिरारोड पोलिसांनी सोमवारी रात्री आरोपी विघ्नेश मेंडन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नंदकिशोर पाटील करत आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in