मीरा-भाईंदरमध्ये तीन दिवसांत चार आत्महत्या; तीन विवाहितांसह अल्पवयीन मुलीचा मृत्यू

शहरात तीन दिवसांत आत्महत्येच्या चार घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये तीन विवाहित महिलांसह एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. चारही घटनांमध्ये संबंधितांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये तीन दिवसांत चार आत्महत्या; तीन विवाहितांसह अल्पवयीन मुलीचा मृत्यू
मीरा-भाईंदरमध्ये तीन दिवसांत चार आत्महत्या; तीन विवाहितांसह अल्पवयीन मुलीचा मृत्यू'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

भाईंंदर : शहरात तीन दिवसांत आत्महत्येच्या चार घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये तीन विवाहित महिलांसह एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. चारही घटनांमध्ये संबंधितांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भाईंदर, काशिमीरा, नवघर आणि उत्तन सागरी अशा चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.

भाईंदर पश्चिम येथील सुजाता सुदामा लाहा (२७) यांनी शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली. पती सुदाम लाहा यांनी त्यांना तातडीने टेंभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत, मिरारोड येथील सुप्रिया मोरे (२७) यांचा मृत्यू झाला. शनिवारी आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पती राजेश मोरे यांनी दिलेल्या माहितीवरून काशिमीरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

तिसऱ्या घटनेत, भाईंदर पूर्व येथील गंगा ललितकुमार अदलाखा (वय ५३) यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी घरात कोणीही नसताना ही घटना घडल्याचे समोर आले. पती ललितकुमार अदलाखा यांनी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

चौथ्या घटनेत उत्तनच्या धावगी डोंगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. मुलीने बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला होता. घटनेनंतर तिला पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात दाखल केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)