मीरा-भाईंंदरमध्ये मराठीची गळचेपी? पोलिसांकडून दबावतंत्राचा आरोप

मीरा-भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व मराठी एकीकरण समितीने प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर थेट आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेतर्फे पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
मीरा-भाईंंदरमध्ये मराठीची गळचेपी? पोलिसांकडून दबावतंत्राचा आरोप
Published on

शंकर जाधव /डोंबिवली

मीरा-भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व मराठी एकीकरण समितीने प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर थेट आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेतर्फे पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले की, मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाचा, भाषेचा आणि संस्कृतीचा गळा दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीहून आदेश येत असून, हिंदी भाषेला पुढे करण्यासाठी मराठीची पिळवणूक होत आहे. यासंदर्भात मनसे व मराठी एकीकरण समितीने प्रशासनाला नोटीसही पाठवली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून, यामुळे हे प्रकरण अधिकच तापले आहे.

राज ठाकरेंनी यावर भाष्य करताना स्पष्ट म्हटले आहे की, ‘आमची सत्ता रस्त्यावर आहे. लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढत राहू.’ मीरा-भाईंदरमध्ये सध्या मनसे कार्यकर्त्यांची एक टीम दाखल झाली असून, दुसरी टीमही तयार स्थितीत आहे.

राहुल कामत, शहराध्यक्ष डोंबिवली

जिल्हा अध्यक्ष दीपिका पेडणेकर यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर सरकार मराठी भाषिकांशी आणि मोर्चेकऱ्यांशी असे वागणार असेल, तर मनसे शांत बसणार नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही मीरा-भाईंदरमध्ये उतरू. या पत्रकार परिषदेस शहर व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in