Mira-Bhayandar: भाजपच्या आमदार- नगरसेवकांवर कारवाई करावी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पत्र

मीरा-भाईंदर महापालिकेत पत्रकार आणि नागरिकांवर झालेल्या कथित हल्ल्यांसह महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या घेरावाच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची आमदारकी रद्द करण्याची, तसेच संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
Mira-Bhayandar: भाजपच्या आमदार- नगरसेवकांवर कारवाई करावी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पत्र
Mira-Bhayandar: भाजपच्या आमदार- नगरसेवकांवर कारवाई करावी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पत्रX|PratapSarnaik
Published on: 

मीरा-भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेत पत्रकार आणि नागरिकांवर झालेल्या कथित हल्ल्यांसह महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या घेरावाच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची आमदारकी रद्द करण्याची, तसेच संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना लेखी पत्र पाठवले आहे.

१६ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या महासभेचे कामकाज थेट प्रक्षेपित करण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाला होता. यावेळी पत्रकार आणि नागरिकांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक शानू गोहिल आणि ॲड. तरुण शर्मा यांनी पत्रकारांसमोर दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, त्याच रात्री आमदार नरेंद्र मेहता समर्थक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या कनकिया येथील निवासस्थानी पोहोचल्याचा आरोप सरनाईक यांनी पत्रात केला आहे. सुमारे ४० ते ५० नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी निवासस्थानाला घेराव घातल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आयुक्त त्यांच्या कुटुंबासह घरी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.

योग्य ती कारवाई करण्याची विनंती

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त व पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन तक्रारी सादर केल्या. त्यानंतर महापालिकेने भाईंदर पोलिसांना पत्र देऊन प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तपास करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणात महेश गायकर, कातोड बिस्तूर लाभड आणि डॉ. राजेश पालांडे हे पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक दाखविण्यात आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in