आरएमसी मिक्सरने नवविवाहितेचे दोन्ही पाय चिरडले; मिरा-भाईंदरमध्ये भीषण अपघात

भरधाव रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) मिक्सरच्या धडकेत २३ वर्षीय नवविवाहित तरुणीचे दोन्ही पाय चिरडले...
आरएमसी मिक्सरने नवविवाहितेचे दोन्ही पाय चिरडले; मिरा-भाईंदरमध्ये भीषण अपघात
आरएमसी मिक्सरने नवविवाहितेचे दोन्ही पाय चिरडले; मिरा-भाईंदरमध्ये भीषण अपघात
Published on: 

भाईंंदर : काशीगाव दर्गा रोड परिसरात भरधाव रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) मिक्सरच्या धडकेत २३ वर्षीय नवविवाहित तरुणीचे दोन्ही पाय चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. ग्रीन व्हिलेजसमोर झालेल्या या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली असून, अपघातानंतर चालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी पतीसोबत पायी जात असताना मागून आलेल्या आरएमसी मिक्सरने तिला धडक दिली. जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काशीगाव परिसरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ११ सप्टेंबर २०२५ रोजी नीलकमल नाक्याजवळ आरएमसी वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही परिस्थितीत ठोस बदल झाला नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

नीलकमल नाका ते दर्गा रोडदरम्यान शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे आणि आरएमसी मिक्सर, टँकर व डंपरची वर्दळ यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण, वेगमर्यादेची अंमलबजावणी आणि अतिक्रमणे हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in