
भाईंंदर : सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वप्रथम महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश नगरविकास विभागाने सर्व महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे प्रभाग रचना तयार करण्याचे काम मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे.
महापालिकेची प्रभाग रचना पूर्वी प्रमाणेच २०११ च्या जनगणनेनुसारच होणार असल्याने नगरसेवक संख्या ९५ इतकी कायम राहणार आहे.
प्रभाग रचना तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. प्रभाग रचने संदर्भातील अंतिम निर्णय ही समितीच घेणार आहे. यामध्ये एकूण ३५ प्रभाग निश्चित करण्यात आले. तर सदस्य संख्या ११ ने वाढवून ती १०६ केली होती. नगरविकास विभागाने मंगळवारी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
मीरा - भाईंदर लोकसंख्या जवळपास १४ लाखांच्यावर आहे. परंतु २०११ नुसार असलेल्या लोकसंख्या ८ लाख नऊ हजारनुसारच होणार आहे.
२०१७ मध्ये मीरा-भाईंदर महापालिकेची पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतीलच २४ प्रभाग तर नगरसेवक संख्याही ९५ इतकीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.