

भाईदर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीतील मित्रपक्षांनी परस्परांचे उमेदवार, नेते, पदाधिकारी यांची फोडाफोडी करायची नाही, असे ठरले होते. पण सध्या चित्र मात्र वेगळेच दिसत आहे. मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपच्या दिग्गज माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, तर प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी आमदार नरेंद्र मेहता यांचा खरपूस समाचार घेत त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये भाजप संपवून स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली असून नातीगोती व जवळचे उमेदवारी दिली गेल्याचा साथीदार आणि चमच्यांना आरोपसुद्धा केला.
या महापालिका निवडणुकीची सूत्रे स्थानिक नेतृत्वाला कंटाळून पक्षत्याग भाजप आणि पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमची नाराजी नसून स्थानिक पातळीवर नेतृत्व करणाऱ्या आमदार नरेंद्र मेहता यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपापल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींनी भाजपला रामराम ठोकल्यामुळे भाजपमधील आ. मेहता यांच्या विरोधातील नाराजी मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युती झाली नसल्यामुळे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणूक एकमेकांविरोधात लढवत आहेत. प्रामुख्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात ही लढत आहे.
मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
भाजपच्या दीपाली मोकाशी, वीणा भोईर ह्या माजी नागरसेविकांसह माजी सभापती सूर्यकांत भोईर यांनी शनिवारी कार्यकर्त्यांसह मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ह्याआधी भाजपाच्या ओमप्रकाश अग्रवाल, विजय राय, अनिता मुखर्जी, सुनीता भोईर, अश्विन कसोदरिया, डॉ. नयना वसाणी, प्रतिभा पाटील, संजय पांगे, हंसुकुमार पाण्डे, शिवप्रकाश भूदेका, परशुराम म्हात्रे आदी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंत्री सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता.
स्थानिक नेतृत्वाला कंटाळून पक्षत्याग
भाजप आणि पक्षाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमची नाराजी नसून स्थानिक पातळीवर नेतृत्व करणाऱ्या आमदार नरेंद्र मेहता यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपापल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींनी भाजपला रामराम ठोकल्यामुळे भाजपमधील आ. मेहता यांच्या विरोधातील नाराजी मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.