Mira Road: टाकीत बुडून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

मीरारोड येथील हटकेश परिसरात बांधकामस्थळी उघड्या पाण्याच्या टाकीत पडून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Mira Road: टाकीत बुडून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
Mira Road: टाकीत बुडून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

भाईदर : मीरारोड येथील हटकेश परिसरात बांधकामस्थळी उघड्या पाण्याच्या टाकीत पडून साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आयत कुरशीद शेख (४) असे मृत मुलीचे नाव आहे. बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर काशिगाव पोलिसांनी कंत्राटदार मनसुख पटेल याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

आयत ही गौरव एक्सलन्सी, इमारत क्रमांक १ येथील बांधकामस्थळी राहत होती. या निवासी संकुलातील इमारत क्रमांक ८ समोर पोडियम पार्किंगचे बांधकाम सुरू होते. मात्र, या ठिकाणी लहान मुलांना किंवा नागरिकांना प्रवेश रोखण्यासाठी सुरक्षा कुंपण उभारण्यात आले नव्हते. पाण्याच्या टाकीचे मॅनहोल उघडे होते. तसेच परिसरात खोल खड्डे खोदण्यात आले होते. स्वच्छतागृहाकडे जाण्यासाठी या खड्ड्यांवरून पाण्याच्या टाकीजवळून जाणारी अरुंद फळी टाकून तात्पुरती वाट तयार करण्यात आली होती.

दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी खेळत असताना आयत उघड्या पाण्याच्या टाकीत पडली. पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्याचे आढळले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)