Mira Road : टॉवर क्रेन दुर्घटनेप्रकरणी बिल्डरविरोधात उच्च न्यायालयात जाणार; अखेर मृतावर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप

मीरारोड पूर्वेतील घोडबंदर परिसरातील जे.पी. इन्फ्रा रियल्टी प्रा. लि.च्या जेपी नॉर्थ गार्डन सिटी येथील मल्टी लेव्हल पार्किंग प्रकल्पातील टॉवर क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मृत मोहम्मद मुजम्मिल खोकर खोकर यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Mira Road : टॉवर क्रेन दुर्घटनेप्रकरणी बिल्डरविरोधात उच्च न्यायालयात जाणार; अखेर मृतावर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Mira Road : टॉवर क्रेन दुर्घटनेप्रकरणी बिल्डरविरोधात उच्च न्यायालयात जाणार; अखेर मृतावर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Published on

भाईदर : मीरारोड पूर्वेतील घोडबंदर परिसरातील जे.पी. इन्फ्रा रियल्टी प्रा. लि.च्या जेपी नॉर्थ गार्डन सिटी येथील मल्टी लेव्हल पार्किंग प्रकल्पातील टॉवर क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मृत मोहम्मद मुजम्मिल खोकर खोकर यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही बिल्डरला आरोपी करण्यात येत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृताचे नातेवाईक मोहसीन खान यांनी सांगितले की, बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी चार वेळा काशीमीरा पोलीस ठाण्यात पाठपुरावा करण्यात आला. मात्र, पोलिसांनी केवळ कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची भूमिका घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी उशिरा मोहम्मद मुजम्मिल खोकर यांच्यावर कुर्ला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे, काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत, मृताच्या वडिलांना जबाब नोंदवण्यासाठी अनेकदा बोलावले होते. मात्र, ते आंदोलने आणि मोर्चामध्ये सहभागी झाले, पोलीस ठाण्यात आले नाहीत, असे त्यांनी - सांगितले. आता त्यांना नोटीस - बजावून जबाबासाठी पुन्हा - बोलावण्यात आले आहे. पाटील - यांनी स्पष्ट केले की, तक्रारदार - किंवा पोलिसांच्या इच्छेनुसार कोणालाही आरोपी करता येत नाही. तपासादरम्यान उपलब्ध होणारे पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल.

संतापाचे वातावरण

जेपी नॉर्थ गार्डन सिटी येथील टॉवर क्रेन कोसळून मोहम्मद मुजम्मिल खोकर यांचा मृत्यू, एका महिलेचा गंभीर दुखापत झाली, तर दोन डझनहून अधिक वाहनांचे नुकसान झाले. या घटनेनंतर बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले असून परिसरात अद्यापही संतापाचे वातावरण कायम आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in