

भाईंदर : मिरारोड पूर्व येथील घोडबंदर परिसरातील जेपी नॉर्थ गृहसंकुलाच्या शेजारी जे.के. आयरिश सोसायटीशेजारी बांधकाम चालू असलेल्या इमारतीचा टॉवर क्रेन कोसळून एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत.
बांधकाम प्रकल्पावर सुमारे १०० ते १२० फूट उंचीची टॉवर क्रेन गुरुवारी सायंकाळी अचानक कोसळली. या दुर्घटनेत संकुलातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. मृताचे नाव मोहम्मद मुज्जमिल खोकर (२१) आहे.
या इमारतीचे बांधकाम सध्या ११ व्या मजल्यापर्यंत पूर्ण झाले असून त्याच ठिकाणी हा प्रकार घडला.
टॉवर क्रेनचा काही भाग जे.के. आयरिश ह्या गृहसंकुलाच्या परिसरात आणि पार्किंगमध्ये पडल्याने तेथे उभ्या असलेल्या अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.