Mira Bhayandar : टॉवर क्रेन पडून मृत्यू, तरीही बिल्डर मोकाट

मीरारोड पूर्वेतील घोडबंदर परिसरात जे.पी. इन्फ्रा डेव्हलपर्सच्या बांधकामस्थळी टॉवर क्रेन कोसळून २१ वर्षीय मोहम्मद मुज्जमिल खोकर यांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. शेजारील गृहसंकुलातील अनेक वाहनांचेही नुकसान झाले. मात्र, या गंभीर दुर्घटनेनंतरही संबंधित विकासकाविरुद्ध अद्याप फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Mira Bhayandar : टॉवर क्रेन पडून मृत्यू, तरीही बिल्डर मोकाट
Mira Bhayandar : टॉवर क्रेन पडून मृत्यू, तरीही बिल्डर मोकाट X / @Vishii14
Published on

भाईंंदर : मीरारोड पूर्व येथील घोडबंदर परिसरात जे.पी. इन्फ्रा डेव्हलपर्सच्या बांधकामस्थळी टॉवर क्रेन कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत २१ वर्षीय मोहम्मद मुज्जमिल खोकर यांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. तसेच शेजारील जे.के. आयरिश गृहसंकुलाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र, इतकी गंभीर दुर्घटना घडूनही संबंधित विकासकाविरुद्ध अद्याप फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे १०० ते १२० फूट उंचीची टॉवर क्रेन अचानक कोसळली. त्यातील लोखंडी भाग बाकड्यावर बसलेल्या मोहम्मद मुज्जमिल खोकर यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानुसार संबंधित विकासक आणि वास्तुविशारद यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक (नगररचना) पुरुषोत्तम शिंदे यांनी दिली. क्रेन कोसळण्यामागील तांत्रिक बिघाड, देखभालीतील त्रुटी किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, या अपघातात जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान होऊनही संबंधित विकासकाविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in