म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या ८९ लाखांचा अपहार

म्हाडाचे बोगस दस्तावेज देण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही
म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या ८९ लाखांचा अपहार

मुंबई : म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ८९ लाख रुपयांचा अपहार करून सहा जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. विजय सूर्यकांत माने आणि ज्योती बाजीराव पाटील अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. विरार येथे राहणारे तक्रारदार एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आठ वर्षांपूर्वी त्यांची ज्योती पाटील आणि विजय माने यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी त्यांची म्हाडामध्ये चांगली ओळख असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना स्वस्तात म्हाडाचे फ्लॅट दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्याकडून फ्लॅटसाठी ८९ लाख रुपये घेतले होते. ही रक्कम घेतल्यानंतर त्यांना म्हाडाचे बोगस दस्तावेज देण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करूनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in