युजर आयडीसह पासवर्डचा गैरवापर करून नऊ लाखांचा अपहार

मोबाईलवर एअर इंडिया एक्स्प्रेस या एअरलाईनचे सिट कॅन्सल झाल्याचे ॲलर्ट मॅसेज आले होते
युजर आयडीसह पासवर्डचा गैरवापर करून नऊ लाखांचा अपहार

मुंबई : युजर आयडीसह पासवर्डचा गैरवापर करून सुमारे नऊ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अरुणराज शामराज यादव हे अंधेरी येथे राहत असून, त्यांची स्वत:ची ट्रॅव्हेल्स एजन्सी आहे. त्यांचा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून, अंधेरी येथे त्यांच्या कंपनीचे एक कार्यालय आहे. अंधेरीसह मस्जिद बंदर, दिल्ली आणि लखनऊ येथे त्यांच्या कंपनीच्या शाखा आहेत. गेल्या चौदा वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्याकडे ३५ ते ४० कर्मचारी काम करतात. त्यांच्या कंपनीकडून हॉटेलसह विमान तिकीट बुकिंग केले जाते. १७ सप्टेंबरला त्यांच्या मोबाईलवर एअर इंडिया एक्स्प्रेस या एअरलाईनचे सिट कॅन्सल झाल्याचे ॲलर्ट मॅसेज आले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित कार्यालयात कॉल करून कुठलेही सिट कॅन्सल झाले नसल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in