४७ लाखांच्या कर्जाच्या रक्कमेचा अपहार; तिघांविरुद्ध गुन्हा

प्रकार संशयास्पद वाटताच कंपनीने त्याची चौकशी सुरू केली होती
४७ लाखांच्या कर्जाच्या रक्कमेचा अपहार; तिघांविरुद्ध गुन्हा

मुंबई : सुमारे ४७ लाख रुपयांच्या कर्जाच्या रक्कमेचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून अपहार केल्याप्रकरणी तीन आरोपीविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. एका अर्थपुरवठा कंपनीच्या तक्रार अर्जावरून हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सागितले. त्यात मोयदूल शेख, सलिना खालूम आणि देबाशिष चॅटर्जी अशी या तिघांसह इतर आरोपीचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार यांच्या कंपनीकडे गेल्या वर्षी खानम नर्सिंगचे मौयदुल शेख आणि बीडीएस सिस्टमचे देबाशिष चॅटजीसह इतरांनी वैद्यकीय उपकरणे आणि मशिनरीसाठीच्या कर्जासाठी अर्ज केला होता. या कंपनीने पाठविलेल्या वैद्यकीय उपकरणे-मशिनरीची छाननी केल्यानंतर कंपनीने दोन्ही कंपन्यांना ९० लाख ७४ हजारापैकी ५९ लाख ८४ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. ही नंतर नंतर खानम नर्सिंगच्या बँक खात्यात तर ३० लाख ८९ रुपये बीडीएस सिस्टीम या कंपनीला देण्यात आले होते. कर्जाचे वाटप केल्यानंतर काही महिन्यांनंतर मशिनरी आणि वैद्यकीय उपकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी दोन्ही ठिकाणी कंपनीच्या एका प्रतिनिधीला पाठविण्यात आले होते. मात्र तिथे गेल्यानंतर या दोन्ही कंपनीने वैद्यकीय उपकरणे आणि मशिनरी खरेदी केली नसल्याचे उघडकीस आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच कंपनीने त्याची चौकशी सुरू केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in