
मुंबई : बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या फाल्गुणी पाठक हिच्या गरब्याच्या पासेससाठी घेतलेल्या पाच लाख १४ हजाराचा दोन भामट्यांनी अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विशाल शहा व त्याच्या मित्राविरुद्ध एमएचबी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. कांदिवलीतील रहिवाशी असलेला निहार श्रेयस मोदी याचा पेटींगचा व्यवसाय आहे. दरवर्षीप्रमाणे फाल्गुणी पाठकने तिच्या गरब्याचे बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात आयोजन केले असून, हा कार्यक्रम १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. त्यासाठी एका सभासदासाठी ४५ हजारात पासेसची सुविधा उपलब्ध आहेत. काही दिवसांपूर्वी निहारला त्याच्या मित्राने विशाल शहाची माहिती देत तो तिचया कार्यक्रमाचा मुख्य आयोजक आहे. तोच त्यांना ३३ हजारामध्ये पासेस मिळवून देईल, असे सांगितले. त्यामुळे १२ ऑक्टोंबरला निहारने त्याच्यासह त्याच्या कुटुंबीय, मित्रांसह १५६ पासेससाठी पाच लाख चौदा हजार घेऊन बोरिवलीतील औरा हॉटेलजवळ आले होते. यावेळी जश छेडा नावाच्या व्यक्तीने त्यांचा माणूस पासेस घेऊन येत आहे, त्याला पैसे द्या आणि तो सांगेल तेथून तुमचे पासेस कलेक्ट करा असे सांगितले. ठरल्याप्रमाणे तिथे एक तरुण आला असता त्यांनी त्याला ती रक्कम दिली. संबंधित व्यक्तीने फाल्गुणी पाठक गरब्याचे स्वस्तात पासेस देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली होती.