ऑनलाईन फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांत नऊ लाखांचा अपहार

५२ वर्षांचे तक्रारदार व्यवसायाने डॉक्टर असून, ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहतात.
ऑनलाईन फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांत नऊ लाखांचा अपहार

मुंबई : ऑनलाईन फसणुकीच्या गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगाने सुमारे नऊ लाखांचा अपहार केला. फसवणूक झालेल्या एका डॉक्टरसह महिलेचा समावेश असून त्यांच्या तक्रार अर्जावरून बोरिवली आणि कांदिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत. ५२ वर्षांचे तक्रारदार व्यवसायाने डॉक्टर असून, ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहतात. त्यांचे स्वत:चे खासगी क्लिनिक आहे. २२ ऑक्टोबरला त्यांना सोशल मिडीयावर वाहन विक्रीची एक जाहिरात दिसली होती. त्यात फॉरच्युनर ई फोर ही कार अवघ्या १९ लाखांमध्ये उपलब्ध असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने तो एका नामांकित बँकेचा रिकव्हरी क्रेडिट मॅनेजर असल्याचे सांगितले. वाहन कर्ज घेऊन कर्ज न फेडू न शकणाऱ्या अर्जदाराचे वाहन जप्त करण्यात आले असून, या वाहनांची स्वस्तात बँकेमार्फत विक्री सुरू आहे. त्यामुळे त्यांना ती कार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी कारसाठी त्यांचे वैयक्तिक कामदपत्रांसह आगाऊ ३० टक्के रक्कम,वाहन कर्ज तातडीने मंजूर करण्यसाठी त्याला ५ लाख ८७ हजार रुपये पाठवून दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in