मिशन अॅडमिशन सुरु,शिक्षण विभागाचे एक लाख नवीन विद्यार्थी घेण्याचे उद्दीष्ट

पालिका शाळांत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तेलुगू भाषेसह ८ भाषांमध्ये शिक्षण देण्यात येते.
मिशन अॅडमिशन सुरु,शिक्षण विभागाचे एक लाख नवीन विद्यार्थी घेण्याचे उद्दीष्ट

शिक्षणाचा दर्जा वाढवण्याबरोबर विद्यार्थ्यांची संख्या वाढीवर पालिकेच्या शिक्षण विभागाने भर दिला आहे. १४ एप्रिलपासून सुरु केलेल्या मिशन अॅडमिशन अंतर्गत एक लाख नवीन विद्यार्थी घेण्याचे उद्दीष्ट ठेवले असता ते प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. आतापर्यंत ९० हजारांहून अधिक नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला एक लाखांचा टप्पा लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

पालिका शाळांत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तेलुगू भाषेसह ८ भाषांमध्ये शिक्षण देण्यात येते. तसेच पालिका शाळांत शिक्षणासाठी येणारे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे २७ शालेय वस्तूंचे दरवर्षी वाटप करण्यात येते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढीसह संख्येत वाढ करणे, हे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून मिशन अॅडमिशन मोहीम राबवण्यात येत आहे. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी एप्रिलमध्ये ‘एकच लक्ष्य, एक लक्ष’ हा उपक्रम सुरू केला. याला विद्यार्थी-पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने पालिकेची मोहीम यशस्वी ठरत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागल्याने पालिका शाळेतील विद्यार्थी टिकवणे आणि वाढवणे असे दुहेरी आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले होते. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी केंब्रीज बोर्ड, ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, विज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास अशा प्रकारे सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in