कर्जासाठी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर

क्लिनिकमध्ये त्याची जयेशशी ओळख झाली होती. त्याने त्याला कजी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते
कर्जासाठी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर

मुंबई : कर्जासाठी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी जयेश एकनाथ पवार या आरोपीस सात महिन्यांनी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून, त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

ओबेरॉय हॉटेलमध्ये कामाला असलेला तक्रारदार तरुण कांदिवलीतील चारकोप परिसरात राहतो. त्याची पत्नी दाताची डॉक्टर असून, तिचे एक खासगी क्लिनिक आहे. याच क्लिनिकमध्ये त्याची जयेशशी ओळख झाली होती. त्याने त्याला कजी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. दोन वर्षांपूर्वी तक्रारदाराला दिड लाखांच्या पर्सनल लोनची गरज होती. त्यामुळे त्याने जयेशकडे विचारपूस केली होती. त्याने कर्ज देण्याचे आश्‍वासन देऊन त्याच्याकडून त्याचे कागदपत्रे घेतली होती. सप्टेंबर २०२२ त्याच्या बँक खात्यात तीन वेगवेगळ्या कंपनीतून सुमारे पावणेअकरा लाख जमा झाले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने कर्जाची गरज नसल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम त्याला परत केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in