मिठी नदी सेवा रस्तेकामाचा मार्ग मोकळा!पवईतील मोरारजी नगरमधील बांधकामे जमीनदोस्त

मिठी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यावश्यक नागरी सेवा प्रकल्पांतर्गत सदर प्रकल्प वर्गीकृत आहे.
मिठी नदी सेवा रस्तेकामाचा मार्ग मोकळा!पवईतील मोरारजी नगरमधील बांधकामे जमीनदोस्त
Published on

मुंबई : मिठी नदी पुनरूज्जीवन प्रकल्पात बाधित पवई मोरारजी नगर येथील एकूण १६६ बांधकामे बुधवारी जमीनदोस्त करण्यात आली. आता याठिकाणी मिठी नदी सेवा रस्त्याचे अंदाजे ३५० मीटर लांबीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

महानगरपालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ ६) देवीदास श्रीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, एस विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) भास्कर कसगीकर यांच्यासह सहाय्यक अभियंता (परिरक्षण) विभागातील अधिकारी व कामगार यांच्याद्वारे ही निष्कासन कार्यवाही पार पडण्यात आली.

मिठी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यावश्यक नागरी सेवा प्रकल्पांतर्गत सदर प्रकल्प वर्गीकृत आहे. त्यामुळे नदी किनाऱ्याची ही बांधकामे हटवणे गरजेचे होते. आता याठिकाणी मिठी नदी सेवा रस्त्याचे अंदाजे ३५० मीटर लांबीचे काम पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून तातडीने सुरब करण्यात येणार आहे. या कामामुळे मिठी नदी प्रकल्पातील ‘एस’ विभागांतर्गत येणारा टप्पा पूर्ण होणार आहे. निष्कासनापूर्वी बाधित बांधकामधारकांची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाचे महत्त्व समजवण्यात आले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सदर निष्कासन कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांनी दिली. ही कार्यवाही करण्यासाठी १ पोकलेन, १ जेसीबी, २ डंपर तसेच २० अधिकारी, ७० कामगार व ५० पोलिस कर्मचारी तैनात होते, असे त्यांनी सांगितले

logo
marathi.freepressjournal.in