तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी मित्राला आसाम येथून अटक

या तक्रारीची एसीपी डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी मित्राला आसाम येथून अटक

मुंबई : अंधेरी येथे राहणाऱ्या एका तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी दिलदार हुसैन युन्नोस अली या २३ वर्षांच्या आरोपी आसाम येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर तक्रारदार तरुणीचे अश्‍लील फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करून तिच्याकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार तरुणीची सोशल मिडीयावर दिलदार खान नावाच्या एका तरुणासोबत ओळख झाली होती. या ओळखीचे मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले होते. अनेकदा ते दोघेही एकमेकांना व्हिडीओ कॉल करत होते. या कॉलद्वारे त्याने तिला अश्‍लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले होते. या कॉलचे स्क्रिन रेकॉडिंग करून त्याने तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ त्याच्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवले होते. त्यांनतर तिच्या बोगस नावाने वेबसाईटवर तिचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करुन तिची बदनामी केली होती. तसेच आणखीन फोटो आणि व्हिडीओ अपलोड करु नये म्हणून तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. या घटनेनंतर तिने एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती.

 या तक्रारीची एसीपी डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या पथकाने आसामच्या दुर्गम भागात लपून बसलेल्या दिलदार अली या तरुणाला शिताफीने अटक केली. दिलदार हा मूळचा आसामच्या वरांग, लोतुन बाजारच्या पठसिमलो ब्लॉकचा रहिवाशी आहे. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in