आमदार राजन साळवींना तूर्तास दिलासा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्यात शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी छापेमारी केली.
आमदार राजन साळवींना तूर्तास दिलासा

मुंबई : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांना अटकेपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे.

एसीबीने पुढील सुनावणीपर्यंत कठोर सक्तीची कारवाई करणार नसल्याची हमीच न्यायालयात दिली. याची दखल घेत न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास मुभा देत अटकपूर्व जामीन याचिकेची सुनावणी २१ फेब्रुवारीला निश्चित केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्यात शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी छापेमारी केली. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली. तसेच कुटुंबीयांनाही आरोपी बनवून टार्गेट केले जात आहे. निवडणुका जवळ आल्याने सत्ताधाऱ्यांकडून ईडी, एसीबी यांसारख्या विशेष तपास यंत्रणांचा वापर करून पक्षांतरासाठी विरोधकांवर जबरदस्ती केली जात आहे. विरोधकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी सुडबुद्धीने खोट्या केसेस व छापे टाकले जात आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in