महाविकास आघाडीतील आमदारांची विधानभवनातील परिसरात जोरदार घोषणाबाजी

सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है...फिफ्टी- फिफ्टी... चलो गुवाहटी... गद्दारांना ताट-वाटी... चलो गुवाहाटी... चलो गुवाहाटी
महाविकास आघाडीतील आमदारांची  विधानभवनातील परिसरात जोरदार घोषणाबाजी
Published on

ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा... ईडी सरकार हाय हाय... फसवी मदत जाहीर करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... नही चलेगी... नही चलेगी दादागिरी नही चलेगी... सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है...फिफ्टी- फिफ्टी... चलो गुवाहटी... गद्दारांना ताट-वाटी... चलो गुवाहाटी... चलो गुवाहाटी, अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर गुरूवारीही दणाणून सोडला.

बुधवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षाच्यावतीने आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला धारेवर धरण्यात आले. बेकायदा सरकार हाय हाय...अशा घोषणांनी विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला अक्षरशः हैराण करून सोडले. शिवसेनेत बंडखोरी करून गेलेले आमदार विधानभवनात ज्यावेळी येत होते, त्यावेळी आले रे आले गद्दार आले... ५० खोके एकदम ओके... अशा जोरदार घोषणा आक्रमकपणे दिल्या जात होत्या.

logo
marathi.freepressjournal.in