Mumbai Metro 3 च्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी MMRCL सज्ज; CMRS च्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा

आरे कॉलनी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) सज्ज झाली आहे.
Mumbai Metro 3 च्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी MMRCL सज्ज; CMRS च्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा
Published on

भालचंद्र चोरघडे/मुंबई

आरे कॉलनी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) सज्ज झाली आहे. कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) कडून प्रमाणपत्र मिळाल्यावर हे काम सुरू होईल असे सांगण्यात आले.

“आम्ही फेज-१ च्या कामासाठी तयारी केली आहे. कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टीकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आरे जेव्हीएलआर-बीकेसी स्टेशन आणि मेन लाइनच्या प्रमाणनासाठी अर्ज सादर केला जाईल. केंद्र सरकारकडून या दोन्ही मंजुऱ्या मिळाल्यावर, आम्ही फेज-१ चे कामकाज सुरू करू, असे एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.

३० सप्टेंबरपर्यंत काम सुरू होण्याची अपेक्षा आहे का, असे विचारले असता भिडे म्हणाल्या की, “आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. हे सर्व प्रमाणपत्रांवर अवलंबून असेल. महत्त्वाचे म्हणजे आम्ही ते मिळवण्याच्या अगदी जवळ आलो आहोत. मेट्रो ३ हा कुलाबा-वांद्रे-सिप्झ या बाजूने चालणारा ३३.५ किमी लांबीचा भूमिगत कॉरिडॉर आहे.

मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर आरे कॉलनी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रवास सोयीचा होणार आहे. तसेच वाहतुकीचा आणखी एक पर्याय लोकासांठी उपलब्ध होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in