मेट्रो स्थानक ते थेट विमानतळ पादचारी पूल जनतेच्या सेवेत; टर्मिनस २ ते मेट्रो ३ रेल्वे स्थानक जोडले

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ने मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ ते विमानतळाजवळील सीएसएमआयए मेट्रो स्थानकाला जोडण्यात आले ३ आहे. यामुळे विमानतळ २ ते मेट्रो ३ पर्यंतचा प्रवास आता जलद होणार आहे.
मेट्रो स्थानक ते थेट विमानतळ पादचारी पूल जनतेच्या सेवेत; टर्मिनस २ ते मेट्रो ३ रेल्वे स्थानक जोडले
Photo : X ()
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ने मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ ते विमानतळाजवळील सीएसएमआयए मेट्रो स्थानकाला जोडण्यात आले ३ आहे. यामुळे विमानतळ २ ते मेट्रो ३ पर्यंतचा प्रवास आता जलद होणार आहे.

एमएमआरडीए मेट्रो स्थानकाशी थेट जोडणारा नवा फूटओव्हर ब्रिज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ येथे उभारला आहे. हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. हा ब्रिज मेट्रो ३ च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ सोबत थेट जोडण्यात आला आहे. यामुळे विमानतळ ते मेट्रोपर्यंतचा प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित झाला आहे. प्रवाशांना मेट्रोच्या A1 लिफ्ट आणि प्रवेशद्वारापासून ट्रॉली घेऊन थेट टर्मिनलनला पोहोचता येईल.

पायी अंतर ४५० मीटरवरून फक्त ११८ मीटरवर

या पुलाची लांबी ८८ मीटर असून रुंदी ४.३ मीटर, तर उंची ३ मीटर आहे. स्टीलपासून बांधलेला हा पूल मेट्रो लाइन ७ अ स्टेशनच्या कामाच्या वर आणि जमिनीपासून तब्बल २३ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. या पुलामुळे प्रवासातील सोयींमध्ये वाढ होणार आहे. पायी प्रवासाचे अंतर ४५० मीटरवरून फक्त ११८ मीटरपर्यंत कमी होईल. तसेच रस्ता ओलांडण्याची गरज नसेल. हा पूल भूमिगत मेट्रो लाइन ७अ च्या कामांच्या २३ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in