मेट्रोसाठी १२ हजार कोटी मंजूर; एमएमआरडीएकडून १९ कंत्राटांना मंजुरी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १२ हजार कोटींहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंगळवारी मंजुरी दिली. यामध्ये १९ महत्त्वाच्या कंत्राटांचा समावेश आहे. यामुळे मुंबई शहर वाहतूक व्यवस्थेचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या २८४ व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग आणि अटल सेतूसह विविध कामांतील कत्राटांरांच्या नेमणुकींना मंजुरी देण्यात आली. या कंत्राटांत प्रणाली, रोलिंग स्टॉक, नागरी कामे, ट्रॅक्शन पॉवर, एएफसी प्रणाली, डेपो पायाभूत सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) यांचा समावेश आहे.
राज्य शासन भविष्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. एमएमआरडीएकडून मंजूर झालेली १२ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीची गुंतवणूक मुंबईच्या एकात्मिक आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे; या प्रकल्पामुळे आर्थिक गती, शहरी गतिशीलता आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे याविषयी म्हणाले की, एमएमआरडीएकडून झालेली ही ऐतिहासिक मंजूरी राज्य सरकारच्या जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधेच्या बांधणीसाठीच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. १२ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीद्वारे आम्ही एक समतोल, शाश्वत आणि आधुनिक मेट्रो नेटवर्क घडवत आहोत.
प्रमुख प्रकल्प व मंजूर कंत्राट
रु. ४,७८८ कोटी - मेट्रो लाईन ४ आणि ४ अ
एल अँड टी ला एकात्मिक प्रणाली - रोलिंग स्टॉक, सीबीटीसी सिग्नलिंग, दूरसंचार, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स (पीएसडी) आणि डेपो उपकरणांसह - पुरवठा व ५ वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसाठी कंत्राट मंजूर
रु. ५५७.५५ कोटी (सुधारित) - मेट्रो लाईन ४अ
गव्हाणपाडा आणि गायमुख स्थानकांसाठी सिव्हिल कामांमध्ये सुधारित डिझाईन आणि स्थळ-आधारित बदलांसह सुधारित कंत्राट मूल्य मंजूर
रु. १८८.५९ कोटी - मेट्रो लाईन ४
एल अँड टीला भक्ती पार्क ते मुलुंड अग्निशमन केंद्र दरम्यान बॉलस्टलेस ट्रॅक व पॉकेट ट्रॅकसह काम मंजूर, हे मूळ अंदाजापेक्षा १५.७२ टक्केनी कमी दरात मंजूर
रु. ६६८.१५ कोटी - मेट्रो लाईन ६
इरकॉन इंटरनॅशनलला स्वामी समर्थ नगर ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गासाठी पॉवर सप्लाय, ट्रॅक्शन, इ अँड एम प्रणाली, लिफ्ट आणि एस्केलेटर यांची रचना व स्थापनेसाठी आणि 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसाठी कंत्राट मंजूर
रु. ५५१.४१ कोटी एमटीएचएल पॅकेज ४
आयटीएस प्रणाली, टोल व्यवस्थापन, प्रगत वाहतूक नियंत्रण प्रणाली, स्ट्रीट लाईटिंग, प्रशासकीय इमारती आणि सेंट्रल कंट्रोल सेंटरसाठी सुधारित कंत्राट मंजूर
रु. २,२६९.६६ कोटी - मेट्रो लाईन ६
एनसीसी एलटीडी कंपनीला रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, टेलिकॉम प्रणाली, पीएसडीएस आणि डेपो यंत्रणा पुरवठा व स्थापनेसाठी व ५ वर्षांच्या देखभालीसाठी कंत्राट
रु. १०४.६६ कोटी (सुधारित) - मेट्रो लाईन ६
सामान्य सल्लागारासाठी ६८० दिवसांची मुदतवाढ व ३९.६१ टक्के खर्चवाढ मंजूर
रु. ५३५.०८ कोटी - मेट्रो लाईन ४ व ४ए
मल्टी-मोडल इंटिग्रेशन, ३२ स्थानकांवरील एमएमआय काम ४ पॅकेजमध्ये मंजूर
रु. ४३२.६३ कोटी (सुधारित) - मेट्रो लाईन २ अ
डीआरएमसीला ‘डिपॉझिस्ट वर्क अटींनुसार विस्तारलेल्या कालावधीसाठी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त सल्लागार शुल्क मंजूर
११८.२८ कोटी - मेट्रो लाईन ९ व ७अ
उत्तर-दक्षिण मेट्रो मार्गासाठी ओएचई, केबल, विद्युत वितरण व एससीएडीए प्रणाली स्थापनेसाठी कंत्राट मंजूर
रु. २४९.९७ कोटी - मेट्रो लाईन ४ व ४ अ
एएफसी प्रणालीसाठी कंत्राट मंजूर, वडाळा ते गायमुख मार्गासाठी व ५ वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसह