Mumbai : बीकेसीत दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक वापरा; MMRDA चे आवाहन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमएमआरडीएने डब्ल्यूआरआय इंडियाच्या सहकार्याने 'बीकेसी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन' या उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमानुसार बीकेसीमध्ये दर शुक्रवारी 'साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन' पाळला जाणार आहे.
Mumbai : बीकेसीत दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक वापरा; MMRDA चे आवाहन
Mumbai : बीकेसीत दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक वापरा; MMRDA चे आवाहन
Published on

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमएमआरडीएने डब्ल्यूआरआय इंडियाच्या सहकार्याने 'बीकेसी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन' या उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमानुसार बीकेसीमध्ये दर शुक्रवारी 'साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन' पाळला जाणार आहे. या उपक्रमामध्ये बीकेसीतील २ लाख कर्मचाऱ्यांनी दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे एमएमआरडीएने केले आहे. आवाहन वरिष्ठ शासकीय अधिकारी, वाहतूक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत हे आवाहन केले. बीकेसीत २ लाख रोजगार आहेत. तर अनौपचारिक रोजगारांची संख्याही जास्त आहे.

सार्वजनिक वाहतुकीची सुविधा वाढत असतानाही, अभ्यासात दिसून आले की, ५२ टक्के प्रवासी वैयक्तिक वाहने, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षांवर अवलंबून आहेत, तर केवळ २५ टक्के प्रवासी दैनंदिन प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. बीकेसीतील ५४ टक्क्यांहून अधिक प्रवाशांना दररोज प्रवासासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, तर प्रत्येक पाच प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा प्रवास तीन तासांपेक्षा अधिक असतो.

या चर्चेत बीकेसीकडे येणाऱ्या प्रवाशांसमोरील वाहतूक कोंडी, अपुरी फर्स्ट-अँड-लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी आणि मर्यादित वाहतूक पर्याय ही प्रमुख आव्हाने असल्याचे या चर्चासत्रात अधोरेखीत करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in