एमएमआरडीए घेणार ६० हजार कोटींचे कर्ज; मेट्रोच्या प्रकल्पासाठी १२ हजार कोटींची आवश्यकता

६० हजार कोटींमधील उर्वरित निधी हा अन्य विकासकामांसाठी वापरला जाणार आहे.
एमएमआरडीए घेणार ६० हजार कोटींचे कर्ज; मेट्रोच्या प्रकल्पासाठी १२ हजार कोटींची आवश्यकता

मुंबई आणि महानगरात सध्या बरीच विकासकामे सुरू असून, महत्त्वाच्या पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांसाठी तसेच मेट्रोसाठी कर्ज उभारण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) खासगी तसेच सरकारी कर्जवितरण करणाऱ्या संस्थांसोबत चर्चा करत आहे. जुलैमध्ये मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे काम सुरळीत सुरू राहावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची परवानगी ‘एमएमआरडीए’ला दिली होती.

मुंबई आणि महानगरात सध्या ‘एमएमआरडीए’चे विविध प्रकल्प सुरू असून त्यासाठी १२ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ६० हजार कोटींमधील उर्वरित निधी हा अन्य विकासकामांसाठी वापरला जाणार आहे. त्यात मुंबई ट्रान्स हार्बर सीलिंक, शिवडी वरळी कनेक्टर, ठाणे कोस्टल रोड प्रकल्प, तसेच ठाण्यापर्यंत ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार या विकासकामांचा समावेश आहे. ‘एमएमआरडीए’चे प्रमुख एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले की, “सध्या मुंबईतील विविध विकासकामांसाठी ६० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून, हा निधी विविध संस्थांकडून उभारला जाणार आहे.” यासंदर्भात अलीकडेच ‘एमएमआरडीए’च्या आयुक्तांनी केंद्र सरकारची वित्त संस्था असलेल्या ‘आरईसी’च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या संस्थेसोबत बोलणी सुरू आहेत, असे श्रीनिवास यांनी सांगितले. ‘एमएमआरडीए’चे २०२२-२३ सालचे वार्षिक बजेटच १८ हजार ४०४ कोटी इतके आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in