नाही म्हणजे नाही! मनसेने थिएटरमालकांना केले 'हे' आवाहन

आगामी ३० तारखेला पाकिस्तानी चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होण्याची चर्चा असून देशभरात याबद्दल वातावरण तापण्याची शक्यता आहे
नाही म्हणजे नाही! मनसेने थिएटरमालकांना केले 'हे' आवाहन

भारतामध्ये ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनित चित्रपट भारतात हिंदीमध्ये प्रदर्शित होऊ शकतो अशी चर्चा आहे. आधी हा चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्यांनतर याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून ३० डिसेंबर ही करण्यात आली. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली असून थिएटरमालकांना थेट आवाहन करण्यात आले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, "पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही"

यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतो आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाहीच. थिएटरमालकांना नम्र आवाहन आहे की, मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत त्याची तोडफोड किंवा त्याचे नुकसान होईल असे कृत्य करु नका." असं इशारा त्यांनी दिला आहे.

‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट आधी २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. जगभर गाजल्यानंतर हा चित्रपट भारतामध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाने केवळ पाकिस्तानातच नाही तर परदेशातही चांगली कमाई केली आहे. दुबईमध्ये झालेल्या ‘रेड सी फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचे कौतुक करण्यात आले होते. या महोत्सवासाठी उपस्थित असलेला अभिनेता रणबीर कपूरनेदेखील चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन आणि कौतुक केले होते. या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in