मराठी महिलेला जागा नाकारणाऱ्या परप्रांतीयाविरोधात मनसेने आक्रमक ; त्या व्यक्तीने मागितली महिलेची माफी

मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नागारल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
मराठी महिलेला जागा नाकारणाऱ्या परप्रांतीयाविरोधात मनसेने आक्रमक ; त्या व्यक्तीने मागितली महिलेची माफी

नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने मुंबईत मराठी पाट्या लावाव्यात असे निर्देश व्यापाऱ्यांना दिले आहेत. असं असताना दुसरीकडे मराठी माणसांना मात्र परप्रांतियांकडून स्वताच्याचं राज्यात घरं नाकारली जात असल्याचं वास्तव आणखी एकदा समोर आलं आहे. मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नागारल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सोसायटीत मराठी माणसांना परवानगी नाही, अशी मुजोरी गुजराती व्यक्ती दाखवताना दिसत आहे.

पीडित महिलेने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ अल्पावधित सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर गुजरातीं व्यक्तीने नमतं घेत पीडित महिलेची माफी मागितली आहे.

मुलुंडमध्ये (Mulund West) मराठी माणसाला घरं देणार नाही असं म्हणणाऱ्या गुजराती पिता-पुत्राला मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. संबंधित व्यक्तीला माफी मागायला लावली असून या पुढे असा प्रकार होणार नाही असंही या व्यक्तीकडून वदवून घेतलं आहे. तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर राज्यभरातून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. "मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही, तर संताप आहे. आज मला अनुभव आला तो प्रातिनिधीक आहे. अशा किती मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरं नाकारली असतील?" असे तृप्ती यांनी या व्हिडीओमध्ये म्हंटले आहे.

अशा अनेक घटना रोज घडताना दिसत आहेत. मुलुंडमध्ये असाच अनुभव आपल्याला आल्याचं सांगत तृप्ती देवरूखकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला. तृप्ती मुलुंड पश्चिम येथे ऑफिससाठी घर पाहायला गेल्या होत्या त्यावेळी त्यांना मराठी असल्याचं सांगत घर नाकारल्याचा तसेच आपला हात पकडला आणि पतीला धक्काबुक्की केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तृप्ती देवरूखकर यांना एक वयस्कर व्यक्ती हुज्जत घालताना दिसत आहे.

दरम्यान, मांसाहार करतो म्हणतो घरं नाकारल्याच्या तसंच मराठी आहे म्हणून घर किंवा ऑफिस नाकारल्याच्या अनेक घटना मुंबईत घडत असल्याचं नित्याचं झालं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in